इको सेन्सिटीव्ह झोन मधून सिंधुदुर्गला वगळा…

मंगेश तळवणेकर:अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…

⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इको सेन्सिटीव्ह झोन मधून वगळण्यात यावा, अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रद्वारे मागणी केली.दरम्यान झोन मध्ये समावेश झाल्याने शेतकऱ्यांना मोठा ञास सहन करावा लागत असल्याचा देखील श्री तळवणेकर यांनी यावेळी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

श्री.तळवणेकर यांनी लिहिलेल्या पञात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वत्र इको सेन्सिटीव्ह झोन सरसकट लावल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठे हाल झालेले आहेत. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80% शेतकरी व 10% लाकूड व्यावसायिक असुन त्यांच्या पुर्वजांनी वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. कारण आपल्या अडीअडचणींना ती झाडे विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात. परंतु एका झाडाला रु.50 हजार दंड ठेवल्याने शेतकरी व लाकुड व्यावसायिकांवर मोठे संकट पडले आहेत. शासनाने या गोष्टींचा विचार करावा. कारण राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडे 4 ते 5 वर्षांत पुन्हा वाढतात.

जिल्ह्याचे एकण क्षेत्रफळ 50.87.50 चौ.कि.मी. असून त्यापैकी 10.92% वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यामुळे झाडतोडीस परवानगी दिल्यास सिंधुदुर्गात कोणतीही अडचण होणारी नाही. सबब शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून विचार करुन त्याला इको सेन्सिटीव्ह झोन मधून वगळावे. अन्यथा येणा-या विधानसभा व इतर सर्वच निवडणुकींवर याचा परिणाम होणारा असून विद्यमान आमदार, मंत्री यांनाही त्याचा फटका बसणारा आहे. त्यामुळे ही बाब स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांनी शासनाच्या स्तरावर उचलून धरावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला इको सेन्सिटीव्ह झोनमधून लवकरात लवकर वगळून घ्यावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान शासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयात विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वांना बरोबर घेवून मोर्चा आणणार आहोत. त्याची सुरुवात सावंतवाडी तालुक्यापासून करण्यात येणार आहे. आमची मागणी येत्या 8 दिवसात मान्य न झाल्यास रितसर नोटीस देऊन मोर्चाची तारीख कळविणेत येईल. तरी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन ती मंजूर करावी ही विनंती ही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे पत्रद्वारे केले आहे.

अश्या भावना श्री.तळवणेकर यांनी पञाद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविल्या आहेत…

You cannot copy content of this page