नगरपंचायतच्यावतीने गणपती साणा येथे स्वच्छता मोहीम…!

⚡कणकवली ता.१८-: नगरपंचायत “स्वच्छता हि सेवा अभियान 2024” “स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ” स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम नुसार 18 सप्टेंबर रोजी कणकवली नगर पंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती साना, कांबळी गल्ली, कणकवली येथे स्वच्छता प्रतिज्ञा घेवून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेमध्ये कणकवली कॉलेजचे प्राध्यापक/प्राध्यापिका, एनसीसी विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच कणकवली न.प. च्या मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या मोहीम पार पडली.

You cannot copy content of this page