ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ प्रदान…

नवीदिल्ली येथे शानदार सोहळ्यात ऍड. राणे यांनी स्वीकारला पुरस्कार..

⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू, द्वारका येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार लेफ्टनंट जनरल आणि एअर फोर्स कमांडर अजय कुमार सिंह आणि ‘पंचायत’ फेम अभिनेत्री सुनिता राजवाडे यांच्या हस्ते श्री. राणे यांना प्रदान करण्यात आला. यशवर्धन राणे यांनी ‘युवा फोरम इंडिया’च्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
समारंभात श्री. राणे यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करण्यात आले. यापूर्वीही त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर ओळख झाली असून, या पुरस्काराने त्यांच्या कामगिरीला आणखी एक मान्यता मिळाली आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना यशवर्धन राणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, कुटुंबाचे, आणि समर्थकांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशभरात गाजले आहे.

You cannot copy content of this page