मालवणमध्ये एसटी संपाला अत्यल्प प्रतिसाद…

⚡मालवण ता.०४-: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला असून मालवणमध्ये या संपाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला . या संपात मालवण आगारातील बाळा मालंडकर, संजय सावंत, अमित शंकरदास, सतीश वाळके, अरुण वाघमारे, गुरु घाडी, विनायक गोसावी, हेमंत तळवडेकर, स्वप्नील शिंदे, गुरुनाथ गोळवणकर, समीर माळकर, रोहित बावकर, गोट्या पवार आदी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते

एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून काँग्रेसतर्फे श्रीकृष्ण तळवडेकर, बाळू अंधारी, मेघनाद धुरी, देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, बबन गावकर यांनी उपस्थित राहून एसटी कामगारांना सोबत घोषणा दिल्या.

दरम्यान, मालवण एसटी आगारातील ६ ते ७ कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती मालवण आगार प्रमुख श्री सूर्यवंशी यांनी दिली. ते म्हणाले, मालवण एसटी आगारातील १८ गाड्या गणेशोत्सवनिमित्त चाकरमान्यांना आणण्यासाठी मुंबई – मालवण फेरीसाठी गेल्या आहेत. यामुळे मालवण आगाराच्या ५० ते ६० बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत, अशी माहितीही श्री. सूर्यवंशी यांनी दिली.

You cannot copy content of this page