⚡बांदा ता.०४-: भारतीय जनता पार्टी बांदा शहरच्या वतीने बांदा शहर मर्यादित आकर्षक गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख ५०००, ३०००, २००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गणेश मूर्तीच्या वस्त्र आणि अलंकार यांच्या निकषावर परीक्षण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुली असून अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी केदार कणबर्गी (मो. 9422394075) किंवा गुरू कल्याणकर (मो. 9860687441) यांच्याशी संपर्क साधावा. शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी बांदा शहर अध्यक्ष नरसिंह काणेकर यांनी केले आहे.
बांदा भाजप शहरच्या वतीने गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन…
