जयदीप आपटे यांना पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात न घेतल्यास ठाकरे सेना आदोंलन करणार…

सतिश सावंत: राजकोट किल्ल्यावरील राणेंच्या वक्त्यावर केसरकरांनी आपली भूमिका आता स्पष्ट करावी..

⚡सावंतवाडी ता.०४-: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे यांना गणपती पूर्वी पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा महाविकास आघाडी गणपती नंतर रत्यावर उतरणार असा इशारा ठाकरे सेनेचे नेते सतिश सावंत यांनी आज येथे दिला.

दरम्यान राणेंनी राजकोट किल्लायावर केलेल्या वकतव्यावर केसरकरांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन ही श्री सावंत यांनी करत केसरकर यांनी जनतेच्या विकासाच्या नावाखाली केसरकांनी खोके घेऊन स्वतःचा विकास केल्याच आरोप श्री.सावंत यांनी यावेळी केले. वाईटातून चांगले केसरकरांचे झाले असा टोला त्यांनी हाणला. ते सावंतवाडी आयोजित शिवसेना शाखेत बोलत होते.दरम्यान, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया राजकोट प्रकरणानंतर काय राहीली याचा विचार करावा. पालकमंत्री यांचा यात हात नसेल तर जे दोषी आहेत त्यांना निलंबित करावे. ते होत नसून अधिकाऱ्यांना वाचवण्याच काम होत आहे.

यावेळी विधानसभा प्रुमख रूपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, युवा सेना तालु उत्तम लोके ,माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page