⚡सावंतवाडी ता.०२-:
देवसू येथील विमला गार्डन नजिक छोट्या ओहोळवरून पाय घसरून पाण्यात पडलेल्या फेलिक्स तेक्केकारा (वय २९, रा. नेरुळ नवी मुंबई) याचा मृतदेह माडखोल येथील तेरेखोल नदीपात्रात सापडला. आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी बाबल आलमेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
युवक पाण्यात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबविली. त्यानंतर रेस्क्यू टीमचे बाबल आलमेडा व मायकल डिसोझा यांनी पाचारण करण्यात आले. त्यांनी तेरेखोल नदीपात्रात माडखोल पुलाजवळ शोधमोहीम राबविली. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहात फिलिक्सचा मृतदेह आढळाला. पोलिसांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करत त्याला मयत घोषित केले.
पाय घसरून पाण्यात पडलेल्या त्या युवकाचा मृतदेह सापडला…
