अनाधिकृत सिलीका वाहतूक प्रकरणी ट्रक मालकांना १० लाख ८५ हजारांचा दंड…

कणकवली तहसीलदार रमेश पवार यांची माहिती; अनाधिकृत व ओव्हरलोड वाहतूक केल्या प्रकरणी कारवाई..

*💫कणकवली दि.८-:* कासार्डे येथील सिलिका मायनिंग अनाधिकृत प्रमाणे वाहतूक करत असताना सोलापूर येथील ६ ट्रक वर महसूल विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणी त्या ट्रक मालकांना ९ लाख ८८ हजार २३० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच उर्वरित ५ ओव्हरलोड ट्रक मालकांना ९६ हजार ९०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे एकूण १० लाख ८५ हजार १३० रुपये दंड त्या ११ ट्रक मालकांना केल्याची माहिती रमेश पवार यांनी दिली.

You cannot copy content of this page