आंबोली,ता.२८: येथिल कामतवाडी येथे हिरण्यकेशी नदी पात्रात भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लाला पकडून घेरले.यानंतर तेथील ग्रामस्थ प्रवीण राऊत यांनी वनविभाग बचाव पथकाला कळवल्यानंतर पथकाने कुत्र्यांच्या तावडीतून हरणाला वाचवून मलई पठार येथे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.आठवड्या भरातील ही चौथी घटना आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव् वाढत आहे.बाहेरून या ठिकाणी कुत्रे आणून सोडण्याचे देखील प्रकार आहेत.जंगलात हिंस्र प्राणी, बिबट्या वाघांची संख्या देखील जास्त आहे.वस्तिजवळ आता जास्त प्रमाणात सांबर, भेकरी,हरण येऊ लागली आहेत.त्यामुळे कुत्र्यांनी सांबराची शिकार करण्याचे प्रकार वाढले आहेत.पाण्याच्या किंवा तलावाच्या ठिकाणी चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न जास्त करतात.असाच प्रकार कामतवाडी येथे आज घडला.या ठिकाणी कुत्र्यांनी नदीत हरणाच्या पिल्लाला घेरून जखमी केले होते.येथील वन विभागाच्या बचाव पथकाला कळवल्यानंतर पथकातील वनरक्षक संकल्प जाधव, गोरख भिंगारदिवे,अनिकेत देशमुख,तानाजी चव्हाण,अनिकेत आवारे,बाळा गावडे,वसंत गावडे ,वनमजूर नामदेव गावडे
वनमजूर मंगेश सावंत
रॅपिड रेस्क्यू टीम चे सदस्य प्रथमेश गावडे, राकेश अमृसकर यांनी पिल्लाला तेथून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.दोन दिवसापूर्वी जकातवाडी तलाव येथे असाच प्रकार होता तर त्याआधी फौजदार वाडी येथे ,गावठण वाडी येथे असाच प्रकार घडला होता.आठवड्या भरातील घटना बचाव मोहीम पथकाची होती.
