मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये २७ ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीची मुले बालकृष्ण व राधेच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थिती प्रशालेत आकर्षकरित्या सजवलेली दहिहंडी फोडून चिमुकल्यांनी आनंदाने उत्सव साजरा केला. यावेळी बहुसंख्य पालक वर्ग देखील सहभागी झाला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंड्रेला परेरा, सेलिन बर्नार्ड, आकाशवाणी सावंत, सिद्रा शेख या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page