आचरा तीठा येथे ठाकरे सेनेकडून निषेध…

⚡मालवण ता.२७-: छत्रपती शिवरायांचा अपमान करणारया भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत ठाकरे सेनेकडून आचरा तीठा येथे निषेध करण्यात आला.

मालवण राजकोट येथे सोमवारी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याबाबत ठाकरे सेना आक्रमक झाली आहे.
या प्रकरणी ठाकरे सेनेकडून आचरा तीठा येथे काळ्या फिती बांधून घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर,विद्यानंद परब, माणिक राणे,शाम घाडी, परुळेकर,राजू नार्वेकर,दिलीप कावले,संजय परब,जुबेर काझी, समिर लब्दे ,राजू परब यांसह अन्य शिवसैनिक ,शिवप्रेमी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page