शहरात ३ ग्रामीणमध्ये १०
*💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १३ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरी भागात खासकीलवाडा येथे २ तर भटवाडी येथे १ रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात शिरशिगे, कोनापाल, बांदा पाणवळ, आरोस, आंबोली नांगरतास, आंबोली, सावरवाड, सांगेली, मळेवाड, इन्सुली या भागात प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ८४ रुग्ण सक्रिय आहेत.
