*💫बांदा दि.०८-:* जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बांदा येथील पत्रकार विराज विष्णू परब यांनी आपल्या धन्वंतरी मेडिकलच्यावतीने बांदा नंबर १ केंद्र शाळेसाठी हॅण्डवाॉशचे वाटप केले. विराज परब हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्डवाॅशचे बॉटल बांदा केंद्राचे मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, सिद्धेश पावसकर, अल्पिता गाड , जे. डी पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्वछतेसाठी विराज परब यांनी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या या साहित्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून कौतूक करण्यात येत आहे.
विराज परब यांच्याकडून बांदा शाळेला हॅण्डवॉश भेट…
