आंबोलीतील रिक्षाचालकांना उबाठाचा पाठिंबा-:बबन गावडे…

⚡आंबोली,ता.२२-: येथिल प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी रिक्षा व्यवसायिकांची घेतलेली भूमिका योग्य असून उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. केसरकर यांनी स्थानिकांवर अन्याय करणारे असले उद्योग बंद करावेत अन्यथा शिवसेना(उद्धव ठाकरे) आंदोलन करेल असा ईशारा विभागीय अध्यक्ष श्री बबन गावडे यांनी दिला आहे.आंबोली त वन खात्याच्या व दीपक केसरकर यांच्या कारनाम्या विरोधात् उद्धव ठाकरे गटाने ही विरोधी भूमिका घेतली आहे.विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी याला पाठिंबा दिला आहे.

आंबोलीत रोजगाराच्या मोठ्या घोषणा केसरकर यांनी केल्या.मात्र कोणताही रोजगार या ठिकाणी देता आला नाही.मात्र स्थानिक रिक्षा व्यवसायिक यांचा रोजगार संपवण्याचे काम झाले. ठिकठिकाणी वन खात्याच्या जाहिराती लावल्या. आंबोलित वन खात्याला पर्यटनाचे धंदे करण्यास लावून वन खात्याच्या जमिनी वर अतिक्रमन झाले आहे. वन खात्याला आंबोलि त कर्तव्य बजावता आले नाही. राखीव वन जमिनी वर अतिक्रमने केलेली माहित नसतात.मात्र पर्यटन धंदा वन खात्यामार्फत फोफवला आहे. बांधकामे असोत किंवा अन्य व्यवहार वन खाते आंबोलीत जोरात आहे.मात्र ज्या उद्देशासाठी शासनाची वन खात्याची भरती होऊन या ठिकाणी नियुक्ती देऊन काम होत नाही.हे पाहणे ही जबाबदारी शासन कर्त्यांची असते.मात्र कुंपण शेत खाते याकडे वरिष्ट अधिकारी किंवा शासनकर्ते यांनी दुर्लक्ष केले आहे.स्थानिकांच्या आड येणाऱ्या शायनींग चा काहीही उपयोग नाही. आंबोलीत स्थानिकांना सक्षम करण्यासाठी आतापर्यंत काहीही झाले नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांनी निर्णय न घेतल्यास रिक्षा व्यवसायिकांबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना आंदोलन करेल असा ईशारा बबन गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page