मुख्यमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी..
⚡ दोडामार्ग ता.२१-: महाराष्ट्रातील वाहनांना गोवा सीमेवरील पोलिस विनाकारण त्रास देतात.सगळी कागदपत्रे पूर्ण असली तरी काही ना काही कारण सांगून दंड ठोठावतात.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे ; अन्यथा गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर देखील पोलिस आणि आरटीओ यांना कारवाई करण्यास भाग पाडू,असा इशारा शिवसेनेचे दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष आणि मोर्ले पंचायतीचे उपसरपंच संतोष मोर्ये यांनी दिला आहे.
त्यांनी सांगितले की,मी सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी कुटुंबासमवेत पर्ये मार्गे चोर्लेला जात होतो.माझी कार मुंबई पासिंगची आहे; पण ती सिंधुदुर्गातील माझ्या पत्त्यावर नोंदणी झालेली आहे.गाडीची सगळी कागदपत्रे पूर्ण होती.माझा चालक परवानाही होता.तरीही केरी येथील तपासणी नाक्यावरील पोलिसांनी आपल्या गाडीला लावलेले फॉग लॅम्प चायनीज असल्याचे सांगून ५०० रुपयांचा दंड ठोठावल्याचे सांगितले.चायनीज दिवे बाजारात विक्रीसाठी येतात,त्यावर बंदी घाला,आम्हाला त्रास का देता असे सांगून चुकीच्या कारवाईबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली व अधिकाऱ्यांनी तालांव करण्याचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी सीमेवरील पोलिसांनी कुणालाही त्रास देऊ नये;अन्यथा आम्हालाही काय करायचे हे कळते असे सांगितले.
