स्वनिर्मितून राखी बनवत रक्षाबंधन सण साजरा…

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या चौथीच्या विद्यार्थिनींनी राबविला उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी स्वनिर्मितून राखी बनवत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.


मुलांना शालेय जीवनापासून पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवता येऊन स्वाबलंबी बनावे, या हेतूने जिल्हा परिषद शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. यात राखी बनविणे, चिकण मातीपासून फळे, विविध वस्तू, आकाश कंदील, शुभेच्छा कार्ड, बनविणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या इयत्ता चौथीच्या मुलींनी स्वनिर्मितून विविध प्रकारच्या नक्षी, मणी वापरत राख्या बनवून रक्षाबंधन सण साजरा केला. हा उपक्रम राबविताना मुलांना वर्ग शिक्षिका अस्मिता गोवेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page