संजू परब हा माझ्या घरातील भावाप्रमाणे…

निलेश राणे:वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करीत दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.१९-: संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला तर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीच घडले नाही. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ असलेल्या संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी संजू परब यांना शुभेच्छा दिल्या.


संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश राणे यांनी त्यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात भेट देत केक कापून व त्याला शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, मंदार नार्वेकर, बंटी पुरोहित, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे आदी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, संजू परब याने राणे साहेबांचे विचार कधीही सोडले नाहीत. राजकारणामध्ये व जीवनामध्येही आमच्यावर अनेक चढ-उतार आले मात्र या सर्व प्रसंगांमध्ये संजू आमच्या सोबत नाही असे कधीच घडले नाही. त्याला कधी सांगावं लागलं नाही की बोलवावं लागलं नाही तो आमच्यासोबत नेहमी ठामपणे उभा राहिला. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ याला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत अशा शब्दात त्यांनी संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page