मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेत तनिष्का आचरेकर विजयी…

मालवण (प्रतिनिधी)

नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवण बंदर जेटी येथे मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे आयोजित महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तनिष्का आनंद आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांना सोन्याची नथ, पैठणी व १० लाखांचा विमा असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यंदा या स्पर्धेचे ९ वे वर्षे होते. या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन पाटबंधारे माजी उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, महेश जावकर, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, दीपक पाटकर, संदीप परब, शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, बबन शिंदे, विशाल ओटवणेकर, कोळंब ग्रामपंचायत सरपंच सिया रामचंद्र धुरी, माजी सरपंच प्रतिमा भोजने, वायरी ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगांवकर, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, नीलम शिंदे, गणेश वाईरकर, अमित इब्राहिमकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, सल्लागार ऍड. अमृता मोंडकर, सदस्य गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, पल्लवी खानोलकर, योगेश्वर कुर्ले, स्नेहल मेथर, गणेश कुबल, फेलीस फर्नांडिस, गणेश कुशे, ममता तळगावकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, प्रतिभा मोंडकर, दीपा शिंदे, शुभदा पाडगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडिस, केदार केळुसकर, भूषण खोत, योगिता कुबल, रूपाली जुवाटकर , गीता नाटेकर, श्रीहरी खवणेकर आदि उपस्थित होते.

स्पर्धेत २८२ महिला स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रितू विराज किर यांनी मिळविला. त्यांना पैठणी व सोन्याची नथ, १० लाखाचा विमा देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांक विजेत्या मंदा गुरुनाथ जोशी यांना पैठणी व चांदीची पैंजण तर चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या ममता दत्तात्रय कुबल यांना पैठणी, चांदीची पैंजण देऊन गौरविण्यात आले. विजेत्या महिलांना साईनाथ चव्हाण, सिया धुरी, ममता तळगावकर, ऍड. अमृता मोंडकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेत सहभाग आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिलांना कुपन देण्यात आली. यामधून सौ. हिंदळेकर यांना लकी ड्रॉ द्वारे मोबाईल बक्षीस देण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन अध्यक्ष अरविंद मोंडकर व गणेश पाडगावकर यांनी केले.

You cannot copy content of this page