गोरेगोमटे बोलतात, त्यांच्या मनातले पाटेकरालाच ठाऊक…

राजन तेली यांचे विधान:संजू परब यांच्या वाढदिवसी स्वकियाना कानपिचक्या..

सावंतवाडी : प्रामाणिक प्रयत्न करणे आपले काम असते. काही गोरेगोमटे बोलतात. मात्र, ते सगळेच खरे नसे. त्यांच्या प्रत्येकाच्या मनात काय आहे? हे पाटेकरालाच ठाऊक आहे. शेवटी
नशिबात लिहीलेल कोणीही बदलू शकत नाहीत अशा शुभेच्छा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना माजी आमदार राजन तेली यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

श्री. राजन तेली म्हणाले, ‌काहीजण नारायण राणेंवर किती प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. इथले स्थानिक आमदारही बाळासाहेबांवरच प्रेम दाखवण्याच काम करतात. दुर्दैवाने सगळे व्यासपीठ नाही. मात्र, उदारी ठेवण्याची मला सवय नाही. आपली उंची किती आपण बोलतो किती याच भान ठेवून बोलावे असा टोला तेली यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच नाव न घेता हाणला. भाजपच्या मेळाव्यात श्री. दळवी यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार आज तेलीनी घेत स्वकीयांनाच कानपिचक्या दिल्या. तर पक्षाकडे उमेदवारी मागणी करण गैर नाही. संजू परब यांनी प्रामाणिक काम करावे. नगराध्यक्ष म्हणून चांगले काम त्यांनी केले आहे. नगराध्यक्ष पदाचे तिकिटावेळी वेगळा चेहारा आमच्या लोकांनी आणला होता. मात्र, नशिबात आहे ते संजू परब यांना मिळाले. बलाढ्य लोक असताना संजू परब यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. विधानसभेत उमेदवारीसाठी भांडण आहेत असे दाखवले जाते. ही घरातली कुरबूर आहे. कुणालाही वाटण, अपेक्षा ठेवण काही चुकीचे नाही. पद येत असतात. मात्र, भाजपात पद देताना पद्धत वेगळी आहे. कोणाला वाटत म्हणून नाही तर पार्लमेंटरी बोर्ड हे निर्णय घेत असते अशा कानपिचक्या देखील शुभेच्छा देताना श्री. तेली यांनी दिल्या. तर स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण झाल्यानंतर गावागावात निधी मिळाला असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page