मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे उद्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.१८-: मालवण मधील नारळी पौर्णिमा उत्सवनिमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे भव्य आयोजन आयोजन दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यावर्षी ९ वे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही स्पर्धेतील विजेत्या महिलांवर सोन्या चांदीच्या आकर्षक बक्षीसांची उधळण होणार आहे.

या नारळ लढविणे स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रथम क्रमांक- पैठणी, सोन्याची नथ सोबत दहा लाखाचा विमा, द्वितीय क्रमांक- पैठणी, सोन्याची नथ व सोबत दहा लाखांचा विमा, तृतीय क्रमांक -पैठणी व चांदीची पैंजण, चतुर्थ क्रमांक- पैठणी आणि चांदीचे पैंजण यासोबतच स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या महिलेस ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे किंवा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कूपन देण्यात येणार आहे, तसेच या कुपन मधून लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे, आणि या लकी ड्रॉ मधून मोबाईल व इतर आकर्षक बक्षीस ही महिलांना देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना नारळ मंडळाकडून देण्यात येणार आहेत, तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page