तिलारी कालवा दुरुस्तीच्या नावाने मर्जीतील ठेकेदारांनी निधी पाण्यात जिरवण्याचा प्रकार सुरू केलाय…

संजय गवस: दोन वर्षात दोन-चार घटना घडल्या तरी प्रशासनाला काही जाग आलेली नाही…

⚡दोडामार्ग ता.१७-: तिलारी पाटबंधारे कालवा विभागाने कालवे देखभाल दुरुस्ती च्या नावाने आपल्या मर्जीतील लाडक्या ठेकेदारांना कामांचा ठेका देऊन. शासनाच्या निधी पाण्यात जिरविण्याचा प्रकार सुरू केला आहे. या कामांच्या निविदेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.. यासाठी अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांच्या कडे तक्रार करणार असल्याची इशारा शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिला.

तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा फुटी ला जणू स्पर्धा लागली आहे का असा सवाल उपस्थित करत गेल्या दोन वर्षीत दोन चार घटना घडल्या तरी तिलारी प्रशासनाला काही जाग आलेली नाही.. म्हणून अशा घटना वारंवार सुरू आहे.. कालवा देखभाल दुरुस्ती साठी पाच महिन्यापूर्वी निविदा मंजूर करून आपल्या मर्जीतील लाडक्या ठेकेदारांला मोठ्या रक्कमेचा ठेका देण्यात आला.. या ठेकेदारांनी देखभाल दुरुस्ती चे किती कुशल, अकुशल कामगार नेमणूक करून, कोणती देखभाल दुरुस्ती चे काम केले.. देखभाल दुरुस्ती च्या नावाखाली बोगस ठेका ठेवून शासनाचा पैसा कुठे जिरवला जातो.. यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येते.. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी.. तसेच या कालवा फुटी मुळे बाजूच्या शेतकरी,जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी..याबाबत आपण अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांच्या कडे मागणी करणार आहे..अशा इशारा संजय गवस यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page