कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचाराचा कणकवलीत निषेध…

⚡कणकवली ता.१७-: कोलकत्ता येथे एका मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला. या अमानुष घटनेचा देशभर निषेध नोंदवताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग ओपिडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी झाले आहे. मेडिकल व अनेक विभाग या बंद मध्ये सहभागी आहेत.

कणकवली शहरात शनिवारी तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व इतर सहकारी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. यावेळी कणकवली पटवर्धन चौक बस स्थानक मार्गे हा मूक मोर्चा थेट प्रांत कार्यालयाच्या दिशेने चालला होता. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता.

तसेच यावेळी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा…भारत की बेटी न्याय मांग रही है… असा उल्लेख असलेले बॅनर दाखवत सदरचा मोर्चा निघाला होता. यावेळी महिला अत्याचारांविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

You cannot copy content of this page