मालवण बंदर जेटी येथे १९ रोजी भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता १७-: मालवण येथील रॉयल ब्रदर्सच्यावतीने दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ मालवण बंदर जेटी येथे दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मालवणच्या रॉयल ब्रदर्सच्यावतीने हि स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला जिल्हाभरातील स्पर्धक तसेच हौशी युवक तसेच नागरिक उपस्थित राहून नारळ लढविणे स्पर्धेचा आनंद लुटतात

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ३१ हजार रुपये , द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला १५ हजार रुपये , तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ५ हजार रुपये चतुर्थ क्रमांक विजेत्या स्पर्धकाला अडीज हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी ७०० रुपये असून प्रथम १६ संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी स्वतः चे पाच नारळ आणायचे आहेत. उर्वरित नियम स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रॉयल यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद आचरेकर ९३२५२०१३७५, हर्ष मिठबावकर ७०३८२३२५७२, सचिन साळगावकर ९३२५३०९९५२, दर्पण सादये ७७४४०९९०५५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page