Headlines

इन्स्पायर सिंधुदुर्ग कोस्टल सायकलिंग स्पर्धेत मुंबईचा दबदबा…

⚡कुडाळ ता.०२-: पेडल फॉर हेल्थ पेडल फॉर एन्व्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांचे संयुक्त आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 च्या सातव्या एडिशनमध्ये 60 किमीच्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत 40 वर्षावरील खुल्या पुरूष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला गटात गीता यादव प्रथम आली. 14 ते 40 पुरूष वयोगटात सिध्देश पाटील व महिला…

Read More

अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी संजय गावडे…

⚡सावंतवाडी ता.०२-: अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सरमळे येथील ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संजय कृष्णा गावडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय ल गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी प्रमोद टक्के यांनी ही निवड केली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या…

Read More

वैविध्यपूर्ण बोली भाषांमुळे मराठी भाषा समृद्ध – कवयित्री सरिता पवार…

⚡कणकवली ता.०२-: येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रस्तावनेत मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत म्हणाले की, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन…

Read More

अणसूर गावात ३२ लाखांच्या मंजूर विकासकामांचे भूमीपूजन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- अणसूर गावातील विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून सुमारे ३२ लाखांच्या या कामांचा भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि शिदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते पार पडला.अणसूरमध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये वेताळेश्वर मंदिर ते धरमगावडे बस स्टॉप रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ४ लाख रूपये, देऊळवाडी स्मशानभूमी बांधणे…

Read More

कणकवलीत मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले; ४५ हजाराची रोकड लंपास…

⚡कणकवली ता.०१-: शहरातील तेली आळी डीपी रोड वरील जय भवानी हे मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले. यात आतील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये असलेले रोख ४५ हजार रूपये लंपास झाले आहेत. ही घटना २५ फेब्रुवारी रात्री सव्वा नऊ ते २६ फेब्रुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरी प्रकरणी मोबाईल दुकान मालक शांतीलाल पदमानी यांनी आज कणकवली पोलीस…

Read More

पोस्टल खाती उघडण्यात जिल्ह्यात देवगड प्रथम तर गोवा रिजनमध्ये द्वितीय…

चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभाग नवीन खाते उघडण्यात प्रथम.. ⚡देवगड ता.०१-:चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभागात देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यात गावागावात डाक मेळावे आयोजित करून देवगड उपविभाग बचत खाती उघडण्यासाठी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहेतसेच गोवा रिजन मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. रिजन ऑफिसच्या लक्ष्य की और या मोहिमेमध्ये चालू महिन्यात ४ हजारापेक्षा जास्त खाती…

Read More

संदीप करलकर खून प्रकरणी एक जण ताब्यात ; 4 दिवसांची पोलीस कोठडी…

⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याचा मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या खुन प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यापैकी श्यामसुंदर प्रभाकर वाडयेकर (रा.कवठी-बांदेकरवाडी) याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला आज शनिवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस…

Read More

आचरा येथे वन विभागातर्फे माकड पकड मोहीम;ग्रामस्थांमधून समाधान…

⚡मालवण ता.०१-: आचरा गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे.शेती बागायती,नारळ फोफळी तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.लाल तोंडाच्या माकडांचा तर घरात घुसून केलेले जेवण फस्त करण्यापर्यंत मजल गेली होती.यामुळे ग्रामस्थांमधून माकड पकड मोहीम आचरे गावात राबविण्याची मागणी केली जात होती.याची दखल घेत सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी पुढाकार घेत आचरा ग्रामपंचायत तर्फे सावंतवाडी वनविभागाच्या…

Read More

मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केल्यास ती टिकून राहील…

सौ. अस्मिता रावराणे:श्री शिवाजी वाचन मंदिरात मराठी भाषा गौरव दिन साजरा.. ⚡मालवण ता.०१-:मराठी भाषा ११३ देशांमध्ये बोलली जाते. आज अनेक भाषा लुप्त पावत असताना आपली मराठी भाषा टिकवून ठेवायची असेल तर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यापेक्षा आपल्या बोली भाषेतून त्यांना ज्ञान दिले तरच मराठी भाषा टिकून राहील, असे…

Read More

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा…

⚡कुडाळ ता.०१-: संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्रसिद्ध कवी,समीक्षक , प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या शुभहस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
You cannot copy content of this page