⚡कुडाळ ता.०२-: पेडल फॉर हेल्थ पेडल फॉर एन्व्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांचे संयुक्त आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 च्या सातव्या एडिशनमध्ये 60 किमीच्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत 40 वर्षावरील खुल्या पुरूष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला गटात गीता यादव प्रथम आली. 14 ते 40 पुरूष वयोगटात सिध्देश पाटील व महिला गटात योगेश्वरी कदमविजेते ठरले. गोवा,रत्नागिरी ,पुणे, कोल्हापूर, मुंबई, तामिळनाडू, भोपाळ आणि सिंधुदुर्गसह 350 सायकलपटूंनी सहभाग घेतला. तर 25 किमीच्या फन राईडमध्येही उत्फूर्त सायकलपटूंचा सहभाग मिळाला.
कुडाळ येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या मैदानावर इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 60 किमी कोस्टल सायकलिंग स्पर्धा व 25 किमी फन राईडचे उद्घाटन भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,दै तरूण भारतचे शेखर सामंत,जि.प.माजी अध्यक्ष रणजित देसाई ,बॅ.नाथ पैचे उमेश गाळवणकर,सिंधुदुर्ग पोलिसचे सुरेश राठोड,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ.संजय केसरे,सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन अध्यक्ष गजानन कांदळगावकर,सेक्रेटरी अमोल शिंदे,कुडाळ सायकल क्लबचे रूपेश तेली,इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे,रेन्बो रायडर्सचे डॅ.बापू परब,साहो फूडसचे कमलाकर घोगळे,जिल्हा क्रीडा अधिकारी राहूल गायकवाड,डाॅ.जयसिंग रावराणे,डाॅ.जी.टी.राणे,लायन्स क्लब ऑफ कुडाळचे डाॅ अमोघ चुबे,अँड.विवेक मांडकूलकर,आदी उपस्थित होते.
60 किमी कोस्टल सायकल स्पर्धेत 40 च्या पुढील वयोगटात पुरूषमध्ये प्रथम मुंबईचा अनुप पवार ,द्वितीय सतिश सावंत (पुणे),तृतीय किरण पवार (मुंबई), 40 च्यावरील महिला वयोगटात प्रथम गीता यादव (मुंबई),द्वितीय वर्षा येवले (पुणे),तृतीय मुग्धा सामंत (रत्नागिरी), 14 ते 40 पुरूष वयोगटात प्रथम सिध्देश पाटील (कोल्हापूर),व्दितीय यश थोरात (पुणे),तृतीय विन्सेन गोडाॅल (गोवा),14 ते 40 महिला वयोगटात प्रथम योगेश्वरी कदम (सिंधुदुर्ग),द्वितीय श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर),तृतीय सृष्टी कुंभोज( रत्नागिरी) यशस्वी झाले.या सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल,प्रमाणपत्र ,रोख पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,तामिळनाडू,मध्यप्रदेश,अशा देशभरातील सायकल ग्रुप प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.यामध्ये सतिश सावंत ग्रुप पुणे,अनुप पवार ग्रुप मुंबई ,रत्नागिरी सायकल क्लब ,नवनीत वरळीकर ग्रुप मुंबई ,हनुमान चोपडे ग्रुप कोल्हापूर,रामदास जाधव भोईसर ,श्रावणी घोडेस्वार कोल्हापूर,किरण शिंदे ग्रुप मुंबई ,आनंदसिंघ मेहरा भोपाळ मध्यप्रदेश ,आदींचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच सायकल चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडीचे वारकरी 75 वर्षीय स्यकलपटू वसंत रामचंद्र नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर बॅ.नाथ पै चे संस्थापक उमेश गाळवणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कोस्टल सायकलिंग स्पर्धेत विशेष योगदान देणारे प्रथमेश सावंत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकलिंग स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी धावती भेट देत सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या.
यशस्वी आयोजनाबद्दल गजानन कांदळगावार, प्रमोद भोगटे, अभिजीत परब,समीरा प्रभू ,स्निग्धा बांबुळकर,गीतांजली कांदळगावकर ,ॲड. सुप्रिया राणे ,डाॅ बापू परब,पाट हायस्कूलचे संदिप साळसकर,संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे अजित कानशिडे,कुडाळ हायस्कूलचे निखील आरोसकर,मुळदे कृषी महाविद्यालय व संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे एन सी सी कॅडेट पथकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक गजानन कांदळगावकर व अमोल शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले.आभार इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे व रूपेश तेली यांनी केले.
रत्नागिरी सिंधुदुर्गमधील प्रोफेशनल फोटोग्राफर्स टीम ड्रोन कॅमेरासह इव्हेंन्टमध्ये सहभागी झाली होती. 75 वर्षीय रामदास जाधव सायकलने भोईसर मुंबईवरून इन्स्पायर सिंधुदुर्ग कोस्टल सायकलिंग स्पर्धेत सहभागी झाल्याने खास आकर्षण ठरले.त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 60 किमी कोस्टल सायकलिंग स्पर्धेला व 25 किमी ची फन राईडसाठी सिंधुदुर्ग पोलिस,आरोग्य विभाग ,कुडाळ पोलिस ,मुळदे कृषि महाविद्यालय व संत राऊळ महाराज महाविद्यालयचे एन सी सी कॅडेटस ,सर्व पत्रकार व मिडिया ,सर्व प्रायोजक आदींनी मोलाचे योगदान दिल्यानेच भव्य इव्हेंट यशस्वी झाल्याचे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी प्रतिपादन केले.
इन्स्पायर सिंधुदुर्ग कोस्टल सायकलिंग स्पर्धेत मुंबईचा दबदबा…
