Headlines

आणखी नविन एसटी बसेस व २० मिनी बसेस उपलब्ध होणार…

पालकमंत्री नीतेश राणे यांची माहिती:कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. कणकवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील काही बसेस आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देवगड व अन्य तालुक्यात बसेस पुरवल्या जातील. ज्या एसटी बसेस प्राप्त…

Read More

धामापूर येथील भगवती मंदिरात ३० मार्चपासून रामनवमी उत्सव…

⚡मालवण ता.२३-:धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरात श्री देवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दि. ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त एकांकिका व कीर्तन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव होणार आहे. दि. ३० रोजी या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे….

Read More

मालवणात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १०३ प्रकरणे निकाली…

⚡मालवम ता.२३-:दिवाणी न्यायालय मालवण येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी २१ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांतील ८२ प्रकरणे अशी मिळून एकुण १०३ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणामधील एकूण रक्कम रुपये ५ लाख ५० हजार ३९९ एवढी झालेली आहे. सदर लोक…

Read More

मालवणात एकता मित्रमंडळातर्फे ३० रोजी विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-:मालवण सोमवार पेठ मेन रोड येथील एकता मित्रमंडळाच्यावतीने हिंदू नववर्ष, गुढीपाडव्यानिमित्त रविवार दि. ३० मार्च रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री १० वाजता भव्य पडद्यावर ऐतिहासिक हिंदी चित्रपट ‘छावा’ दाखविण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन एकता मित्रमंडळ तर्फे करण्यात आले

Read More

मालवणात स्मृतिलिला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.२३-:सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने सौ. नंदिनी राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वास दिल्या जाणाऱ्या स्मृतिलिला पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये क्रिकेटपटू पुरस्कार देवेंद्र रामचंद्र मांजरेकर यांना, व्हॉलीबॉल पुरस्कार शंकर (भाऊ) विनायक नामनाईक आणि मैत्री पुरस्कार उल्हास आत्माराम सरमळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान…

Read More

रेकोबा हायस्कूलच्या वेद कुबलचे गणित प्रविण्य परीक्षेत यश…

⚡मालवण ता.२३-:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याने अव्वल गुण मिळवून यश संपादन करून तो पुढील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. वेद कुबल…

Read More

राष्ट्रीय जलतरणपट्टू पूर्वा गावडे हिची २४ रोजी आकाशवाणीवर मुलाखत…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील राष्ट्रीय जलतरणपट्टू पूर्वा संदीप गावडे हिची मुलाखत सोमवार दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्रावर प्रसारीत केली जाणार आहे.सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्राचे प्रतिनिधी निलेश कारेकर यांनी जलतरणपट्टू पूर्वा गावडे हिची मुलाखत घेतली आहे या मुलाखती मध्ये जलतरण मधील प्राथमिक शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरा पर्यतचा प्रवास त्यांनी उलघडला आहे बारावीची…

Read More

वेंगुर्ला येथे हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२३-: जलजिवन मिशन अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील हर घर जल झालेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व गौरव करण्याकरीता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २० मार्च रोजी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

आंबोली ग्रामस्थांचे पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन…

आंबोली,ता.२३: बुधवारी आंबोली बाजारवाडी येथे माय लेकाला बलेनो गाडी ने ठोकून एका महिले चे पाय जायबंदी झाले असून एकाला मुक्का मार लागला आहे. मद्यधुंद अवस्थेतील गाडी चालकावर आणि पळून गेलेल्या गाडी चालकावर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांनी अपघात घडवून आणलेल्याना सहकार्य केले.त्यांना पाठीशी घातले. असा आरोप करून पोलिसांविरोधात आंबोली पोलीस स्थानकासमोर अपघात ग्रस्थांचे नातेवाईक,चुरणीची मुस,…

Read More

कणकवली तालुक्यातील ग्रा. पं. पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध…

⚡कणकवली ता.२३-: तालुक्यातील जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, पोटनिवडणूक व नवीन कुर्ती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत काही हरकती असल्यास २४ मार्चपर्यंत हरकती व सूचना तहसील कार्यालयाकडे नोंदवायच्या असून प्रभागनिहाय अंतिम यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी म्हटले…

Read More
You cannot copy content of this page