आंबोली ग्रामस्थांचे पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन…

आंबोली,ता.२३: बुधवारी आंबोली बाजारवाडी येथे माय लेकाला बलेनो गाडी ने ठोकून एका महिले चे पाय जायबंदी झाले असून एकाला मुक्का मार लागला आहे. मद्यधुंद अवस्थेतील गाडी चालकावर आणि पळून गेलेल्या गाडी चालकावर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांनी अपघात घडवून आणलेल्याना सहकार्य केले.त्यांना पाठीशी घातले. असा आरोप करून पोलिसांविरोधात आंबोली पोलीस स्थानकासमोर अपघात ग्रस्थांचे नातेवाईक,चुरणीची मुस, चौकुळ ग्रामस्थ,आंबोली ग्रामस्थ यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.याबाबत त्यांनी  निवेदन गृहमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,पोलीस निरीक्षक यांना  दिले आहे. निवेदनावर बाबू कोकरे,पांडू झोरे,सोनू कोकरे,गंगाराम झोरे,भागू कोकरे,धोंडू कोकरे,भैरू यमकर,गंगाराम येडगे,गणपत पाटील,जाणू कोकरे,रामू कोकरे,अमोल कर्पे,सचिन नार्वेकर,गजानन कर्पे,हेमंत कर्पे,महेश नार्वेकर आदिंच्या सह्या आहेत. आज सकाळी अकरा वाजता ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे.

You cannot copy content of this page