कणकवली तालुक्यातील ग्रा. पं. पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध…

⚡कणकवली ता.२३-: तालुक्यातील जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, पोटनिवडणूक व नवीन कुर्ती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत काही हरकती असल्यास २४ मार्चपर्यंत हरकती व सूचना तहसील कार्यालयाकडे नोंदवायच्या असून प्रभागनिहाय अंतिम यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी म्हटले आहे.

नवीन कुर्ली ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांमध्ये ७ जागांसाठी तसेच बोर्डवे प्रभाग-२, कासार्डे प्रभाग-२, कळसुली प्रभाग-३, हुंबरठ प्रभाग-१, शिरवल प्रभाग-३, दारिस्ते प्रभाग-१, हळवल प्रभाग-३, डामरे प्रभाग-१, कलमठ प्रभाग-३, साकेडी प्रभाग-३ या दहा ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी, तर पिसेकामते प्रभाग-१ व प्रभाग २, तळेरे प्रभाग-१ व प्रभाग २ अशा प्रत्येकी दोन जागा मिळून बारा ग्रामपंचायतींच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक मतदार याद्या तयार करून प्रसिद्ध करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार १२ ग्रामपंचायतींच्या २४ जागांसाठी पोटनिवडणूक व नवीन कुर्ली वसाहत नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी मतदार याद्यांची प्रसिद्धी संबंधित ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय आणि कणकवली पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्टवर प्रसिद्ध केली आहे. या प्रारुप मतदारयाद्यांवर मतदारांनी १४ मार्चपर्यंत आपल्या हरकती व सूचना तहसील कार्यालयाकडे लेखी नोंदवायच्या आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page