⚡मालवण ता.२३-:
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याने अव्वल गुण मिळवून यश संपादन करून तो पुढील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.
वेद कुबल याला प्रशालेचे गणित शिक्षक श्री. गोसावी व श्री. कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
