⚡मालवण ता.२३-:
धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरात श्री देवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दि. ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त एकांकिका व कीर्तन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव होणार आहे.
दि. ३० रोजी या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. सकाळी श्रींची विशेष पूजा, वर्षफल वाचन व रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक होणार आहे. रात्री ९.३० वा. नाईक मोचेमाडकर यांचे नाटक. ३१ रोजी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, ९.३० वा. आयडीयल इंग्लिश मीडियम इको स्कूल नेरुर प्रस्तूत एकांकिका ‘तरंगत्या बेटावर’ १ रोजी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, ९.३० वा. रंगप्रसंग कोल्हापूर प्रस्तूत ‘अल्मोस्ट डेड’ एकांकिका २ रोजी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, ९.३० वा. परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर प्रस्तूत एकांकिका ‘बॅलेन्स’ ३ रोजी सकाळी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक. रात्री ९.३० वा. ह. भ. प. श्री विश्वनाथ तथा भाऊनाईक यांचे ‘त्रिंबकेश्वर’ या विषयावर कीर्तन. ४ रोजी सकाळी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, ९.३० वा. ह. भ. प. सौ. आरती बापट यांचे ‘विष्णूदत्त’ आख्यानावरील कीर्तन. ५ रोजी सकाळी श्रींची विशेष पूजा, रात्री ८.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, ९.३० वा. ह. भ. प. हरिअर नातू यांचे ‘कौशिकी अवतार’ आख्यानावरील कीर्तन. ६ रोजी रामनवमी दिवशी सकाळी श्रींची उत्सव पूजा, १०.३० वा. पुराण वाचन, ११ वा. ह. भ. प. हरिहर नातू यांचे राम जन्मावर कीर्तन, दुपारी १२.३९ वा. राम जन्मोत्सव, १.३० वा. श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी ४ ते ८ वा. स्थानिक भजने, ९.३० वा. पुराण व पालखी मिरवणूक, रात्री १२.३० वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचे नाटक सादर होणार आहे.
यादरम्यान हनुमान जयंती उत्सवही साजरा केला जाणार असून यानिमित ११ एप्रिल रोजी सकाळी श्रींची उत्सव पूजा, ११ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. पुराण वाचन, १०.३० वा. पालखी मिरवणूक, ११.३० वा. प्रसादराव गाडगीळ यांचे कीर्तन, त्यानंतर देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग. १२ रोजी पहाटे ५ वा. प्रसादराव गाडगीळ यांचे कीर्तन व हनुमान जन्म, सकाळी ६.३० वा. पालखी मिरवणूक, ७.३० वा. आरती व प्रसाद वाटप होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
