Headlines

कुडाळ बसस्थानकाचे कोलमडलेले वेळापत्रक तातडीने सुधारा…

युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा:मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन.. ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ परिसरातील नियमित प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना एसटी बसच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा मोठा फटका बसत असल्याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. बससेवा तातडीने पूर्ववत न केल्यास प्रवाशांना…

Read More

मालवणात रोटरी क्लब व लिमये हॉस्पिटलतर्फे बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

१५५ नागरिकांची मोफत तपासणी… ⚡मालवण,ता.०५-:रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे घेण्यात आलेल्या अस्थी खनिज घनता Bone Mineral Density (BMD) तपासणी शिबिरातएकूण १५५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाला…

Read More

मुंबई -गोवा मार्गावर साळीस्ते येथे भीषण अपघात…

कंटेनरला मागून दुचाकीची धडक, दुचाकीस्वार ठार:कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर साळीस्ते दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61 D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रायडर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी…

Read More

चेंदवणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकाराचे अर्चना बंगे यांच्याकडून कौतुक कुडाळ : चेंदवण गावातील एकही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकारातून व मराठा क्लॉथ, कुडाळ यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चेंदवण क्र. १ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या वालावल…

Read More

नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया यांची जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट…

सेवाभावी कार्याचे केले भरभरून कौतुक.. ⚡कुडाळ ता.०५-: बाईक हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे संस्थापक तथा देशातील नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया आणि त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटोदिया यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी त्यांनी सेवाश्रमातील विविध उपक्रमांची माहिती घेत लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.देशातील सुमारे १५ प्रमुख शहरांमध्ये आलिशान हॉटेल्सचे…

Read More

मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेत आदित्य, जयेश, आस्था विजयी…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळेंमधील पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या एकाहत्तर मुलांनी व मुलींनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम…

Read More

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला नाचणी लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव…

⚡वैभववाडी ता.०५-: शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी बांधावरची शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विद्या मंदिर मांगवली नं 1 येथील विद्यार्थ्यांनी दिलीप राणे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नाचणी लागवडकरून शेतीचा अनोखा अनुभव घेतला.शेतभेटीदरम्यान दिलीप राणे यांनी विद्यार्थ्यांना शेतीतील विविध अवजारे, पिकांची लागवड, शेतीची कामे तसेच कृषीविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात सखोल भर…

Read More

आंबोली महादेवगड पॉईंट येथे ४०० फूट दरीत कोसळलेल्या निपाणीच्या पर्यटकाचा मृतदेह सापडला…

सावंतवाडी : निपाणी येथील एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव होते. आज पहाटेपासून पुन्हा एकदा सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आंबोली, सांगेलीकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी…

Read More

जिल्हा उद्योग केंद्राच्या आयटी प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी, ता.०५-:जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गवाणकर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी शिंगटे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय…

Read More

चिवला बीच हिंदळेकरवाडा येथे वीज ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून वचनपूर्ती.. ⚡मालवण ता.०४-:मालवण शहरातील चिवला बीच, हिंदळेकरवाडी येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. हिंदळेकर वाडा महापुरुष मंदिर येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा…

Read More
You cannot copy content of this page