श्री रवळनाथ कलश मिरवणूक उत्साहात…
वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) स्त्री-पुरुषांची पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर, तरंगदेवतांच्या उपस्थितीत भव्य रथातून श्री रवळनाथाच्या कलशाची मोठ्या भक्तिमय वातावरणात वेंगुर्ला शहरात मिरवणूक काढण्यात आली.
वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) स्त्री-पुरुषांची पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर, तरंगदेवतांच्या उपस्थितीत भव्य रथातून श्री रवळनाथाच्या कलशाची मोठ्या भक्तिमय वातावरणात वेंगुर्ला शहरात मिरवणूक काढण्यात आली.
माऊली विद्यालयात सावंत फाउंडेशनचे आयोजन.. कुडाळ : अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात नेमकं दडलंय तरी काय हे खरं तर जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते. पण ते जाणून घेण, उघड्या डोळ्यान पाहणं शक्य नसत. हेच जाणून सावंत फौंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली यांनी गोवा विज्ञान केंद्र पणजी यांच्या सहकार्यान चेंदवणच्या श्री देवी माऊली…
खासदार नारायण राणे: ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२७-: तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्घाटन ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील वेगळी अशी ही गोशाळा असणार असून येथे देशभरातील विविध प्रकारच्या गाई पाळल्या जातील. माझ्या जिल्ह्यातील…
⚡बांदा ता.२७-: मुंबई गोवा महामार्गांवर सटमटवाडी येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफाटात नेल्याने दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ 50 डेगवे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत
संजू परब:कुडासे येथील विद्यालयात गुरुवर्य सन्मान सोहळा संपन्न… दोडामार्ग : ज्या शाळेत आपण शिकलो ती शाळा सुस्थितीत ठेवणे हे माजी विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडले. ज्यांनी मुलं घडवण्याचे काम केलं अशा व्यक्तींचा सत्कार माझ्याहातून होतोय हे माझं भाग्य आहे. ज्यांनी शाळा उभारली अशा महात्म्यांना माझं अभिवादन. आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेवर असच प्रेम…
ओरोस येथील कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद.. सिंधुदुर्गनगरी, दि. २७: ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब झाले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेला हा कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेला. ओरोस खर्येवाडी येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला जम्मु काश्मीरमधील पहलगामजवळ बेसरन व्हॅली…
कणकवली :कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी खा. विनायक राऊत यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , महिला आघाडी अध्यक्ष निलम पालव , तालुकाप्रमुख कन्हैया पारकर , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम…
कणकवली ः अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे यांची निवड करण्यात आली. मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षपदी व्यंकटेश सावंत, सचिवपदी सागर राणे, सहसचिवपदी शिवशंकर पाडगावकर, खजिनदारपदी यश पालव, सहखजिनदारपदी रुपेश सांळुखे, सदस्यपदी सुधाकर राणे, सर्वेश राणे, रोहन राणे, पंकज बागवे, रोहन चव्हाण, ललित राणे, आर्दश राणे, संदेश आईकर, तर सल्लागारपदी संतोष राणे, रवी जोगळे,…
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर (वय ८९) यांचे शनिवारी दुपारी दुःखद निधन झाले. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सालईवाडा येथील दवाखान्यात गेली अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीकरांना वैद्यकीय सेवा दिली. अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर होते. साहित्य, संगीताची त्यांना विशेष आवड होती. गुणकारी डॉक्टर असल्याने पंचक्रोशीतील रूग्ण त्यांच्याकडे येत….
⚡सावंतवाडी ता.२६-: माठेवाडा येथील घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. मृतदेहाला दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे. मयत तारी हे मूळ शिरोडा येथील आहेत. आठवडाभरा पूर्वी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेल्याचे समजते. आजारपणामुळे…