Headlines

मालवणात लायन्स क्लबतर्फे परिचारिकांचा सन्मान…

मालवण ता.१४-:जागतिक परिचारिका दिनानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय व रेडकर हॉस्पिटलला भेट देऊन तेथे कार्यरत असलेल्या परिचारिकांना गुलाबपुष्प आणि मिठाई देवून त्यांच्याठायी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत एक नर्स आपल्याला आपल्या आरोग्य सुधरविण्यासाठी विविध प्रकारे मदत करीत असते, त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत, जगातील सर्व…

Read More

कलंबिस्त इंग्लिश इयत्ता दहावीच्या 93-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन…

⚡सावंतवाडी ता.१४-: धमाल, मस्ती, खेळ, बरोबरच प्रेमळ खोडकरपणा आणि तेवढ्याच हळव्या आठवणींचा मागोवा यामुळे आंबोली येथील वैशाली नेचर रिसॉर्ट, परिसरात हास्यकल्लोळ माजला, निमित्त होते कलंबिस्त इंग्लिश स्कूल, इयत्ता दहावीच्या 1993-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन ! या संमेलनात मिनी शाळा भरली होती. या हरहुन्नरी बॅचचे हे सलग तिसरे संमेलन, दरवर्षी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून मुद्दाम वेळ काढून…

Read More

डॉ. आंबेडकरनगरमध्ये नाल्यातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर…

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून होतेय काम:पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांचे मोठे योगदान.. कुडाळ :शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.यामुळे पावसाळ्यात याभागातील पुरस्थितीतला आळा बसणार आहे.कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधून भंगसाळ नदीपर्यंत ओहोळ जातो गेले…

Read More

सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांची समाजाप्रती तळमळ आत्मसात करुया…

प्रथम स्मृतीदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना ; डबलबारी सामन्याला भजन रसिकांची उपस्थिती कणकवली : असलदे गावातील विकास प्रक्रियेत व सरस्वती हायस्कुल नांदगाव या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये या गावचे माजी सरपंच कै. अंकुश डामरे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी संपूर्ण जीवनात एक सामाजिक बांधिलकी करत केलेले काम आजच्या नव्या पिढीला एक प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळात त्यांनी…

Read More

संविधान देशात राजकीय स्थिरता आणि सुव्यवस्था निर्माण करते…

विनोद सातार्डेकर यांनी कीर्तनातून दिली संविधानाची माहिती.. मालवण (प्रतिनिधी) संविधान कायद्याचे राज्य सुनिश्चित करते आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्यापेक्षा जास्त अधिकार मिळत नाही, हे स्पष्ट करते. संविधान देशाची ओळख आणि मूल्ये दर्शवून देशाच्या नागरिकांमध्ये एकात्वाची भावना निर्माण करते. संविधान देशात राजकीय स्थिरता आणि सुव्यवस्था निर्माण करते असे प्रतिपादन कीर्तनकार विनोद सातार्डेकर यांनी संविधान हा…

Read More

मोटर सायकल वरील ताबा सुटून परप्रांतीय कामगारांचा अपघात…

दुपारची घटना:अधिक उपचाराकरता गोवा बांबुळी येथे हलविले.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मोटर सायकल वरील ताबा सुटून माजगाव चर्च समोर परप्रांतीय कामगारांचा अपघात झाला यामध्ये संबंधित कामगार गंभीर जखमी हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचाराकरता गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले. संबंधित कामगार हा आपल्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलने बांधावरून सावंतवाडीच्या…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग चौथ्या वर्षी १००% निकाल : गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम…

⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड आणि २ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेडमध्ये यश संपादन केले._ विशेष बाब म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या या…

Read More

जोरदार वाऱ्यासह कणकवलीत पाऊस…!

कणकवली : तालुक्यात आज २:३० वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाढलेल्या उष्णतेत पाऊस कोसळल्याने वातावरण थंडगार झाले होते. कणकवली शहरात मात्र अगदी पावसाच्या सुरुवातीलाच तेली आळी येथी महावितरण चा ट्रान्सफार्मर फुटला होता. त्यामुळे महावितरण विभागाचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read More

नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत युवामोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले अभिनंदन…

कणकवली : महाराष्ट्रातील भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड काल जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड झाल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, शहराध्यक्ष सागर राणे, सुनील बांदेकर, बाबू राणे उपस्थित होते.

Read More

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मारुती एस क्रॉस गाडीचा अपघात…

माडखोल परिसरातील घटना: चालकाला किरकोळ दुखापत.. ⚡सावंतवाडी ता.१४-: गाडीवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी एस क्रॉस गाडी लाईटच्या खांबाला आढळून अपघात झाल्याची घटना माडकोल परिसरात काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी कारचालकाला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविले आल्याचे…

Read More
You cannot copy content of this page