⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड आणि २ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेडमध्ये यश संपादन केले._
विशेष बाब म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या या शाळेत दोन विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली. या उज्वल यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, तसेच मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.