ज्येष्ठ दशावतारी झांज वादक शांताराम राणे यांचे निधन…
कुडाळ : तालुक्यातील कवठी गावकरवाडी येथील रहिवासी व ज्येष्ठ झांज वादक शांताराम तुकाराम राणे उर्फ बाबी गावकर (वय ९५) यांचे मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.दशावताराचा वारसा असलेल्या कवठी गावातील शांताराम राणे यांनी आपल्या झांज वादनाच्या कलेतून नाट्यक्षेत्रातील वडिलांचा वारसा पुढे चालविला. वयाच्या ३० व्या वर्षापासून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला….
