“ऑपरेशन सिंदूर”च्या समर्थनार्थ सावंतवाडीत उद्या तिरंगा रॅलीचे आयोजन….

⚡सावंतवाडी ता.२०-: पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या धाडसी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या समर्थनार्थ आणि शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी सावंतवाडी शहरात उद्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली बुधवार, दिनांक २१/०५/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता गांधी चौक येथून सुरू होईल. विविध सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग, विद्यार्थी,, महिला मंडळे, तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या देशप्रेमाची भावना व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रॅलीच्या माध्यमातून भारतीय जवानांचा सन्मान, त्यांच्या कार्याची जाणीव आणि देशभक्तीचा संदेश देण्याचा उद्देश आहे. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी वातावरण देशभक्तिमय होणार आहे.

You cannot copy content of this page