⚡मालवण ता.१९-;
मूळ पळसंब-मालवण येथील व सध्या मुंबईस्थित बाललेखिका आदिती पुजारे हिने दहावीपर्यंत लिहिलेली दहा स्व:लिखित पुस्तके मालवण येथील नगर वाचन मंदिर या ग्रंथालयास भेट स्वरुपात दिली.
यावेळी आदिती पुजारे म्हणाली की, माझ्या शालेय अनुभवांच्या भावना मांडण्यासाठी मी लेखनाकडे वळले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक शोधले. ‘इन द टॉक्सिक वर्ल्ड’ हे पहिले पुस्तक आहे. कांदिवली येथील प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी सगळी पुस्तके वाचून मला प्रोत्साहीत केले आहे. यावेळी ग्रंथपाल संजय शिंदे यांनी आदितीची विशेष प्रशंसा केली. तिला ग्रंथभेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मालवण नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल संजय शिंदे, आदिती पुजारेचे वडिल भालचंद्र पुजारे, दीपा कदम, सहाय्यक कर्मचारी रमाकांत जाधव व वाचनप्रेमी नागरिक उपस्थित होते.
