सिंधुदुर्ग महाविद्यालयात १४ रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागामार्फत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सन्मान देशभक्तांचा आणि मशाल फेरी – तिरंगा रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात सन्मान देशभक्तांचा हा कार्यक्रम होऊन त्यामध्ये सध्याचे आर्मी ऑफिसर यांचा…
