Headlines

कळसुली येथील श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिरात १४ जानेवारी रोजी हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१३-: तालुक्यातील कळसुली श्री. स्वयंभू भोगनाथ मंदिर, भोगनाथवाडी, येथे दरवर्षीप्रमाणे बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी हरिनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता घटस्थापना व आरतीने होणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्रामस्थांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी ७ वाजता श्री देव भोगनाथ विद्यामंदिर, कळसुली नं….

Read Full News

“पूर्वसूचना न देता तिलारीच्या उपकालव्यात पाणी सोडले…

बांदा शहरात पूरसदृश स्थिती: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. ⚡बांदा ता.१३-: तिलारीच्या बांदा उपकालव्याची साफसफाई व किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आल्याने बांदा शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले असून शेती, भाजीपाला, पिके, घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये…

Read Full News

रत्नागिरीत २२ जानेवारी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव..

कोकणातील नागरिकांना आली संधी ; सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग.. ⚡कणकवली ता.१३-:महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर कोकणभूमीला पुन्हा एकदा अध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श लाभणार…

Read Full News

वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे श्री विशाल परब व सौ वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी गवंडळकर उत्तम कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभाप्रसंगी राजकीय आणि सामाजिक…

Read Full News

मालवण लायन्स क्लबकडून अंध अपंग बांधवांसाठी अन्नदान सेवा उपक्रम…

⚡मालवण ता.१३-:अंध अपंग बांधवांसाठी दैनंदिन जीवनातील कामकाजात आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने आयोजित कार्यशाळे दरम्यान मालवण लायन्स क्लब तर्फे अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात आला. या अन्नदान सेवाकार्यासाठी लायन्स क्लबच्या सदस्या…

Read Full News

देवबाग हायस्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप…

⚡मालवण ता.१३-:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीमधील २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकली आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या सायकलींचे वाटप कंपनीचे…

Read Full News

बांदा ग्रामपंचायत कार्यालयातील तुटलेले फरशा तात्काळ बसवा…

ग्रापं सदस्य साईप्रसाद काणेकर यांची मागणी.. ⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायत कार्यालयातील फरशा अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला आहे. नागरिक, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच फरशा फुटलेल्या असल्याने कार्यालयाच्या सुरक्षिततेसह ग्रामपंचायतीच्या प्रतिमेलाही धक्का बसत…

Read Full News

मळगाव-आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ नाट्यप्रयोगाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: मळगाव येथील आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता आवेरा वेंगुर्ला येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा दत्त नामस्मरणाचे महत्व सांगणारा ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन मळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.या नाट्यप्रयोगाची कथा व संकल्पना अजित गाडगीळ (गुरुजी) यांची आहे. या नाट्यप्रयोगात काका आकेरकर, सुशील रेडकर, साईल तळकटकर, राहुल धुरी, श्रीपाद आरोलकर,…

Read Full News

झाराप महामार्ग येथे सर्कल व्हावे…

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिधुदुर्गनगरी ता १३ अपघात होऊ नयेत, यासाठी बंद करण्यात आलेला झाराप येथील मिडल कट अपघातांचे कारण ठरतआहे . तरी झाराप येथे सर्कल व्हावे . अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून झाराप ग्रामस्तानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .या मागणीची दखल न घेतल्यास येत्या २६जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा झाराप पंचकोशी ग्रामस्थांनी दिला…

Read Full News

निगुडे येथील महेश सावंत यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वेत्ये सोनुर्ली येथे सुरू असलेल्या बेकायदा काळ्या दगड उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत निगुडे (ता. सावंतवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उत्खननासंदर्भातील अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सावंतवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page