मळगाव-आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ नाट्यप्रयोगाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: मळगाव येथील आझाद मैदान येथे १६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता आवेरा वेंगुर्ला येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा दत्त नामस्मरणाचे महत्व सांगणारा ‘श्रीक्षेत्र गाणगापूर’ दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन मळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगाची कथा व संकल्पना अजित गाडगीळ (गुरुजी) यांची आहे. या नाट्यप्रयोगात काका आकेरकर, सुशील रेडकर, साईल तळकटकर, राहुल धुरी, श्रीपाद आरोलकर, अमेय साटम, गुरु वराडकर, राजन नाईक, अक्षय नाईक व चंद्रू मिशाळे आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत. या कलाकारांना हार्मोनियम-अमोल आकेरकर, पखवाज-राजू शिरोडकर व झांज-प्रमोद आकेरकर संगीतसाथ करणार आहेत. मळगाव तसेच परिसराती नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page