Headlines

*’स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत भटवाडी येथे नगरपरिषदेतर्फे जनजागृती

*नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती सावंतवाडी-: शहरातील ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभाग क्र. १ भटवाडी दत्तमंदिर येथे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती परिमल नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, रसिका नाडकर्णी, नगरपालिका कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.

Read Full News

चिपी विमानतळ भरती प्रक्रियेत स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्या

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची आयआरबी च्या अधिकाऱ्यांकडे मागणी *💫कुडाळ दि.१५-:* स्थानिक वृत्तपत्रे व सोशल मीडियावर चिपी विमानतळ 23जानेवारी 2021 रोजी कार्यान्वित होणार या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याअनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांसह सोमवारी चिपी विमानतळ येथे आय आर बी चे अधिकारी श्री लोणकर अमर पाटील एअर ट्राफिक कंट्रोल…

Read Full News

जिल्ह्यात एकूण ५ हजार १२४ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या ३५३ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 124 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

सरंबळ येथील अनधिकृत वाळू उसपा करणाऱ्या होडीला आग लावून केले नष्ट

कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व पथकाची कामगिरी : अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये घबराट *💫कुडाळ दि.१५-:* कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व त्यांच्या पथकाने सरंबळ येथे अनधिकृत वाळू उसपा करणाऱ्या होडीला आग लावून होडी नष्ट केली, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. तहसीलदार यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. कुडाळ…

Read Full News

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने शहीद जवानांना वाहण्यात आली आदरांजली

रेडी येथील सप्तेश्र्वर स्वयंभू महादेव मंदिरात दीप लावून वाहिली आदरांजली* *💫वेंगुर्ले दि.१५-:* वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील श्री सप्तेश्र्वर स्वयंभू महादेव मंदिरात दिनांक १३ डिसेंबर रोजी श्री देवी माउली जत्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दीपोत्सव व एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली आहे. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या…

Read Full News

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कै. दादा परब यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* कसाल गावचे प्रमुख मानकरी बळीराम ( दादा ) परब  यांचे नुकतेच निधन झाले. यांच्या निधनाने दुःखी परब कुटुंबातील सदस्यांची आपूलकिने विचापूस करत माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार श्री नारायण राणे व सौ निलमताई राणे यांनी सांत्वन केले.      यावेळी खासदार    राणे म्हणाले बळीराम ( दादांचे) वय जरी झाले असले तरी ते…

Read Full News

जिल्ह्यात रिक्त वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करा….

*युवासेना व तालुका महिला आघाडी कडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहन निरीक्षकांची कमतरता असल्यामुळे सिंधुदुर्गात वाहन चालक परवाना गेले ७-८ महिने बंद असल्याने सिंधुदुर्ग तसेच शेजारील गोवा राज्यात नोकरीला मोटारसायकल ने प्रवास करणाऱ्या युवकांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसाकरवी दंडात्मक त्रास सहन करावा लागत असून सिंधुदुर्गात सद्या ८…

Read Full News

सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी द्यावे

*काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांची मागणी *💫सावंतवाडी दि.१५-:* सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता, चोवीस तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी शहरातील नागरिकांना किमान मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. दरम्यान सावंतवाडी शहरात व्यवसाय करणाऱ्या मिनी टेम्पो चालक मालकांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसतर्फे आमचा पाठिंबा…

Read Full News

बांदा येथे सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण

*व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून लोकार्पण *💫बांदा,दि.१५-:* सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण बांदा स्मशानभूमीत आज व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात आले. यामुळे वेळेची व लाकडाची बचत होणार आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, रिया…

Read Full News

जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

झाराप तीठा येथील जागा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* झाराप तिठा येथे मुंबई गोवा महामार्ग लगत  आपल्या मालकीच्या जमिनित  हायवे बाधीत असलेली दुसऱ्याची इमारत पाडून आमची जागा मोकळी करून दया. या मागणीसाठी लक्ष्मीकांत सामंत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.     मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात येथील रवींद्र सामंत यांच्या मालकीची जमीन बाधित…

Read Full News

You cannot copy content of this page