जिल्ह्यात रिक्त वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करा….

*युवासेना व तालुका महिला आघाडी कडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

*💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहन निरीक्षकांची कमतरता असल्यामुळे सिंधुदुर्गात वाहन चालक परवाना गेले ७-८ महिने बंद असल्याने सिंधुदुर्ग तसेच शेजारील गोवा राज्यात नोकरीला मोटारसायकल ने प्रवास करणाऱ्या युवकांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसाकरवी दंडात्मक त्रास सहन करावा लागत असून सिंधुदुर्गात सद्या ८ पैकी ४ निरीक्षकांची बदली झाल्याने रिक्त असलेल्या वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करण्यासाठी युवासेना उप जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर सोमकांत नाणोस्कर व शिवसेना तालुका महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडून परिवहन मंत्री अनिल परब यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्याकडून निवेदन पाठवण्यात आले आहे. तसेच ईमेल द्वारे देखील त्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. यावेळी तालुका महिका संघटक अपर्णा कोठावळे, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, मदन राणे, भिवा गवस, पंकज शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page