*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* कसाल गावचे प्रमुख मानकरी बळीराम ( दादा ) परब यांचे नुकतेच निधन झाले. यांच्या निधनाने दुःखी परब कुटुंबातील सदस्यांची आपूलकिने विचापूस करत माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार श्री नारायण राणे व सौ निलमताई राणे यांनी सांत्वन केले. यावेळी खासदार राणे म्हणाले बळीराम ( दादांचे) वय जरी झाले असले तरी ते रोज देवळात व बाजारपेठेत जनतेच्या सेवेकरीता फिरताना दिसत. कोणताही कार्यक्रम आयोजित केला कि मला मात्र पहिले येऊन भेटत होते. त्याचा अचानकपणे जाण्याने गावात मात्र त्यांंची उणीव भासणार आहे. आम्ही तुमच्या दु:खात सामिल आहोत.असे सांत्वन भेटी दरम्यान बोलताना सांगितले. यावेळी कसाल सरपंच सौ संगीता परब ,उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल शिक्षण संस्था अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, आनंद( उर्फ ) भाई सावंत, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर ग्रामपंचायत सदस्य गोपाळ निगुडकर, बाप्पू पाताडे. पडवे सरपंच सुभाष दळवी ,डॉ. मिलिंद कुलकर्णी,आदि उपस्तित होते.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कै. दादा परब यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
