Headlines

चिपी विमानतळाची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा – खा. विनायक राऊत

*चिपी विमानतळ प्रकल्पाचा खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा वेंगुर्ले दि.३१-:* चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.एटीएस टॉवरची तसेच विमानतळाच्या यंत्रणेची पाहणी केली. आवश्यक सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारी २०२१ रोजी चिपी…

Read Full News

अखेर त्या टॉवरचे काम सुरू

सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.३१-:* आजगाव येथील बी.एस. एन. एल टॉवर गेले अनेक दिवस बंद होता. हा टॉवर ३० डिसेंबरच्या आत सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांनी बी.एस. एन एल च्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. अखेर…

Read Full News

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह ग्रामस्थांच्या भेटीला…

गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण;तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थांकडून विधीवत पूजन *💫सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण असून घरी आलेल्या तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थ पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत, भक्तिभावाने पूजन करीत आहेत. मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा…

Read Full News

जिल्ह्यात आज आठ जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 221;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 497 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 8 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

Read Full News

गावातील शुद्ध पाण्यावर असणार आता महिलांची नजर

फिल्ड टेस्ट किट द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रत्येक ग्रामपंचायतीतील पाच महिलांना देण्यात आले ऑनलाईन प्रशिक्षण गावातील शुध्द पाण्यावर आता गावातील महिलाची नजर असणार आहे. फिल्ड टेस्ट किट (FTK) व्दारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील प्रती ग्रामपंचायत पाच महिलांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधूदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन…

Read Full News

झुआरी जंक्शनचा अनोखा उपक्रम,बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*💫दोडामार्ग दि.३१-:* मानवी जीवनासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्यातील एक महत्त्वपूर्ण गरज म्हणजे अन्न ही गरज मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ओळखली जाते व ही पूर्ण करतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा, म्हणूनच शेतकरी राजाला पूर्ण जगाचा पोशिंदा मानला जातो. आपल्याकडील शेतकरी हा पूर्णता प्रगतशील शेतकरी नसल्याने व आपल्या शेतकऱ्यांना प्रगतशील शेती संदर्भात…

Read Full News

*डिसेंबर नंतर ‘उखडे ऊखडे’ गॅंग सत्तेत नसणार

माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वीकारले* *💫सावंतवाडी दि.३१-:* गेली वर्षभर राजकारणापासून अलिप्त असून देखील काल उद्घाटनासाठी आलेल्या माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्यावर नाहक टिका केली आहे. गेल्या वर्षभरात सावंतवाडी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. आपणच येथले मालक असल्यासारखे सत्ताधारी वागत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष…

Read Full News

मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या खुल्या काव्य लेखन स्पर्धेत रूपाली दळवी, मनीषा पाटील, सूरज यादव विजेते

*💫कणकवली दि.३१-:* किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेत पांग्रड येथील रूपाली दळवी-नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अजय कांडर यांनी काम पाहिले अशी माहिती मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नव्या कवींना प्रेरणा मिळावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय काव्य लेखन…

Read Full News

श्री.दिग्विजय फडके यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

*💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* श्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तर स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यादा निवड झाली आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या राज्य स्तर नवोपक्रम स्पर्धेत Enrichment of English in rural…

Read Full News

कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली;

एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी *💫रायगड दि.३१-:* कशेडी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी (31 डिसेंबर) पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page