सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांच्या मागणीला यश
*💫सावंतवाडी दि.३१-:* आजगाव येथील बी.एस. एन. एल टॉवर गेले अनेक दिवस बंद होता. हा टॉवर ३० डिसेंबरच्या आत सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांनी बी.एस. एन एल च्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, या टॉवरचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे.
