मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या खुल्या काव्य लेखन स्पर्धेत रूपाली दळवी, मनीषा पाटील, सूरज यादव विजेते

*💫कणकवली दि.३१-:* किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेत पांग्रड येथील रूपाली दळवी-नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अजय कांडर यांनी काम पाहिले अशी माहिती मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नव्या कवींना प्रेरणा मिळावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रूपाली दळवी नाईक यांच्या ‘वणवा’ या कवितेने प्रथम क्रमांक पटकावला तर कणकवली येथील कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘माणूस बी होऊन रुजला असतात तर’ या कवितेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर वैभववाडी-नापणे येथील कवी सुरज यादव यांच्या ‘बाप’ कवितेने तृतीय क्रमांक पटकावला. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापनदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून नांदगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी निबंध, काव्य लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवर साहित्यिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या उपस्थित करण्यात येणार आहे.यावेळी सदर काव्य पुरस्कार विजेत्या तीन कवींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती श्री मोरजकर यांनी दिली

You cannot copy content of this page