Headlines

अंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

महिला व बालविकास समितीकडून साजरी करण्यात आली जयंती *💫सावंतवाडी दि.०३-:* महिला बालविकास समिती व अदिती सामंत यांच्याकडून आज सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी समितीच्या वतीने तेथील महिलांना खाऊ आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी अदिंती सामंत हिच्यासह तेथील दोन महिलांचे जन्मदिवस देखील…

Read Full News

लेखक चंद्रकांत पारकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन…

मान्यवर साहित्यिकांकडून पुस्तकांचे कौतुक *💫मालवण दि.०२-:* कोकणातील लेखक श्री. चंद्रकांत पारकर यांनी लिहिलेल्या आणि चंदना पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केलेल्या ‘कोकणातील माणसं’ व ‘उधाण’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मालवण धुरीवाडा येथील अमूल मयेकर यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पारकर यांच्या दोन्ही पुस्तकांचे मान्यवर साहित्यिकांनी परीक्षण करून पारकर यांच्या लिखाणाचे कौतुक केले. हा पुस्तक…

Read Full News

भंडारी हायस्कुलचे माजी कला शिक्षक पुंडलिक केळुसकर यांचे निधन

*💫मालवण दि.०२-:* मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी कलाशिक्षक आणि मालवण कोतेवाडा येथील रहिवासी पुंडलिक महादेव केळुसकर (वय ८०) यांचे आज शनिवारी रात्रौ पावणे सात वाजण्याच्या सुमारास मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने निधन झाले. केळुसकर हे चित्रकलेत तरबेज होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक असणाऱ्या केळुसकर यांनी अनेक विद्यार्थ्यां मधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित केले…

Read Full News

घरच्या सत्काराने जबाबदारी वाढली!;

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब *💫मालवण दि.०२-:* माझ्या गावात झालेला सत्कार हा घरचा सत्कार आहे असे मी मानतो. या सत्काराने अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. मसुरे गाव शेती प्रधान असल्याने येथील शेतकऱ्यांचा सन्मान सर्वांनी करावयास हवा. समर्थ बागवे महाराज संस्थांनच्या माध्यमातून याठिकाणी धार्मिकता अखंड टिकवण्याचे काम चालू आहे. संस्थानला यापुढील काळात सुद्धा माझे…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे

कुळकरवाडी रस्ता,क्षेत्रफळ रस्ता, शांतादुर्गा मंदिर सुशोभीकरण कामांना कार्यारंभ आदेश *💫मालवण दि.०२-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे वडाचापाट ग्रामपंचायतीचे शिवसेना सरपंच उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ यांनी केलेल्या मागणीनुसार वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे मंजूर झाली आहेत.या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. यामध्ये २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत…

Read Full News

मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ५ जानेवारी रोजी

*💫मालवण दि.०२-:* मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. गजानन नाईक, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

Read Full News

चिपी विमानतळाच्या परवानग्या आपल्याच मुळे पूर्ण

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे विधान *💫सावंतवाडी दि.०२-:* जिल्ह्यात चिपी विमानतळ व्हावे यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आपण केंद्रीय मंत्री असल्यामुळेच पूर्ण होऊ शकल्या असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आपण स्वतः आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या चीपी विमानतळाचे भूमिपूजन…

Read Full News

राज्य सरकारने सहकार्य केल्यास जिल्ह्याचा होईल विकास

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सावंतवाडीत वक्तव्य* *💫सावंतवाडी दि.०२-:* राज्य सरकारने सहकार्य केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवू शकतो असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे भेटी दरम्यान केले आहे.

Read Full News

भुयारी गटार योजना राबवण्यासाठी नगरपालिकेला केंद्रातून दिडशे कोटी रुपयांचे अनुदान द्यावे…

नगराध्यक्ष संजू परब यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात आजही भुयारी गटार ची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भुयारी गटार ही योजना राबवण्यासाठी नगरपालिकेला केंद्रातून दिडशे कोटी रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read Full News

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची सावंतवाडी नगरपालिकेस सदिच्छा भेट

*💫सावंतवाडी दि.०२-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रथमच भाजपची सत्ता असलेल्या सावंतवाडी नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page