घरच्या सत्काराने जबाबदारी वाढली!;

सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब

*💫मालवण दि.०२-:* माझ्या गावात झालेला सत्कार हा घरचा सत्कार आहे असे मी मानतो. या सत्काराने अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. मसुरे गाव शेती प्रधान असल्याने येथील शेतकऱ्यांचा सन्मान सर्वांनी करावयास हवा. समर्थ बागवे महाराज संस्थांनच्या माध्यमातून याठिकाणी धार्मिकता अखंड टिकवण्याचे काम चालू आहे. संस्थानला यापुढील काळात सुद्धा माझे सहकार्य राहील असे प्रतिपादन मुंबई मनपा सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी येथे केले. मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे सदानंद परब यांची सलग दुसऱ्या वेळी अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल माजी प. स. सदस्य महेश बागवे, माजी उपसरपंच अशोक बागवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक तथा मसुरे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ दीपक परब, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, रामकृष्ण बागवे, गणपत बागवे, बाळा मेस्त्री, सौ मनीषा बागवे, राजन परब, अनिल बागवे, प्रकाश बागवे, सुनील परब, प्रथमेश राणे, बाळा बागवे, राहुल बागवे, प्रसाद बागवे, बुवा गुंडू सावंत, बुवा विनोद चव्हाण, सागर बागवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधत डॉ दीपक परब, संग्राम प्रभुगावकर, सौ. परब यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी डॉ दीपक परब यांनी शुभेच्छा देताना समर्थ बागवे महाराज यांची महती सांगितली.तसेच संस्थांनच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. श्री प्रभुगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक महेश बागवे यांनी करताना समर्थ बागवे महाराज तसेच येथील दत्त मंदिर येथे होणारे कार्यक्रम याबद्दल माहिती दिली तर आभार श्रीकृष्ण बागवे यांनी मानले.

You cannot copy content of this page