चिपी विमानतळाच्या परवानग्या आपल्याच मुळे पूर्ण

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे विधान

*💫सावंतवाडी दि.०२-:* जिल्ह्यात चिपी विमानतळ व्हावे यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आपण केंद्रीय मंत्री असल्यामुळेच पूर्ण होऊ शकल्या असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आपण स्वतः आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या चीपी विमानतळाचे भूमिपूजन केले होते असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या परवानग्या पूर्ण केल्यास लवकरच सुरू होईल असे ते म्हणाले. यावेळी कल्पनेतील उडाने भरपूर झाली आता विमान उडायला हरकत नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page