नगराध्यक्ष संजू परब यांनी सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात आजही भुयारी गटार ची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भुयारी गटार ही योजना राबवण्यासाठी नगरपालिकेला केंद्रातून दिडशे कोटी रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
